शि.क. (शिळा कलम...पोस्टच्या सुरूवातीला आहे ना....!) ठीक आहे, मान्य आहे शीर्षक थोडं घासून पुसून गुळगुळीत वगैरे झालेलं आहे.....पण काय शीर्षकं द्यायची कळत नाही हो! त्यापेक्षा थेट मुद्द्यालाच गुद्दा घालतो.....सगळं तसं कॉमन आणि कॉमनसेन्सिकल आहे....पण तरीही लिहितोच एकदाचा!
तर रियल एस्टेट. जाम मजा येते ना, जेव्हा आपल्या घरांचे भाव वाढतात, अगदी आकाशाला भिडतात....आपल्याला वाटतं आपलं घर आता आपल्याला आपलं घर महागात विकता येईल, आणि (उगाचच असं वाटतं की) स्वस्तात एखादं मोठं घर आपल्याला घेता येईल. मात्र हा बूम खरोखर किती चांगला असतो? की नसतोच?
मॉलमध्ये गोष्टी महाग का मिळतात? ती "पेपे"ची जीन्स, तीन आकडीवरून चार आकडी किंमतीवर सहज ओलांडून का जाते? तर मॉल रेंटल्स. दर चौ.फु. मागे ’लीज’ चा दर दरमहा रु. १००-२००-३००....काहीही असतो! दुकानांचे क्षेत्रफळ १००० चौ.फु. पेक्षा जास्त नक्कीच असते. आणि हे पैसे दुकानदारांना द्यावे लागतात. बिल्डरांना द्यावे लागतात. आणि ते रिकव्हर कुठून होतात? तर ते ’पेपे’ची पॅंट अलगद आपला खिसा कापून जाते, तेव्हा ते रिक्व्हर होतात....नाही का?
बरं, हे झालं कंझ्युमरबद्दल. समजा एक होतकरू बिझनेसमन आहे. त्याला मुंबईत एक धंदा सुरू करायचा आहे. भांडवल तसं जेमतेमच आहे. ते तसं जेमतेमच असतं नेहमी... अशा वेळेस त्याने कुठे किती पैसे टाकावेत? त्याने असलेले पैसे जास्तीत जास्त मशीन्समध्ये, माणसांमध्ये, मटेरियल्समध्ये टाकावेत.....की हे सगळं सामावणाऱ्या प्रिमायसेस मध्ये? रियल इस्टेट बूमचा फटका त्यालाही बसतोच!
मुंबईत एक गोदरेज कॅंपस सोडून आयटी कंपन्या कुठे दिसतात का? नव्या मुंबईत दिसतात. मुंबईत नाही....कारण? आणि त्यामुळे मुंबईकर इंजिनियर्स बंगलोर, हैदराबाद, कोईमतूर, अगदी इंदूरमध्येही सापडतात...मुंबईत चुक्कूनही नाही!
एकूण रियल एस्टेट बूमची ही दुसरी उणी बाजूही कधीतरी विचारात घ्यायला हवी. आता म्हणे रियल एस्टेटचे भाव सर्वत्र पडणार आहेत, ते झाल्यास हळूहळू वरच्या aggrieved parties ना थोडाफार आशावाद बाळगायला हरकत नाही!
मी रियल एस्टेटवर आणखी दोन पोस्टस टाकणार आहे....याच लेखाचे सिक्वल्स म्हणा....वेळ मिळेल तेव्हा!
Monday, August 25, 2008
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा